12 वी फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या अंतिम तारीख, शुल्क आणि संपूर्ण माहिती

​HSC Exam Application Form Notification 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य मंडळाने इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

​नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व संबंधित विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित मुदतीत आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या लेखात आपण अर्ज भरण्याची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे, फोटोचे नियम, शुल्क भरण्याची पद्धत आणि इतर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

​HSC परीक्षा अर्ज २०२७: थोडक्यात आढावा

  • ​मंडळाचे नाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे)
  • ​परीक्षा वर्ग: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी / HSC)
  • ​परीक्षा सत्र: फेब्रुवारी – मार्च २०२७
  • ​नियमित अर्ज भरण्याचा कालावधी: १ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६
  • ​अधिकृत संकेतस्थळ: www.mahahsscboard.in

​कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?

​महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नियमानुसार खालील प्रवर्गातील विद्यार्थी फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत:

  1. ​नियमित विद्यार्थी (Regular Students): कनिष्ठ महाविद्यालयातून २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी उत्तीर्ण होऊन १२ वीत नियमित शिकत असलेले विद्यार्थी.
  2. ​पुनर्परीक्षार्थी (Repeaters): मागील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेले किंवा श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी.
  3. ​खाजगी विद्यार्थी (Private Candidates): फॉर्म नं. १७ द्वारे नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केलेले खाजगी विद्यार्थी.
  4. ​व्यासाय अभ्यासक्रम व ITI विद्यार्थी: MCVC तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI) ‘Transfer of Credit’ घेणारे विद्यार्थी.

​ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा

​महाराष्ट्र राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खालीलप्रमाणे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:

  • ​विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा काळ: १ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत.
  • ​महाविद्यालयांनी शुल्क भरण्याची व प्रिलिस्ट जमा करण्याची अंतिम तारीख: ७ डिसेंबर २०२६.
  • ​विशेष सूचना: सद्यस्थितीतील दुष्काळी व इतर परिस्थितीचा विचार करून मंडळाने विलंब आणि अतिविलंब शुल्क न आकारता नियमित शुल्कानुसार अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

​कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया (Step-by-Step Guide)

​१. सरल प्रणालीचा डेटा (FYJC Data): नियमित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे सरल प्रणालीमधील PFN-ID मध्ये कोणताही बदल न करता, २०२६-२७ मध्ये प्रविष्ट इयत्ता ११ वीच्या (FYJC) ऑनलाइन डेटावरून पॉप-अप (Popup) करून भरली जाणार आहेत.

२. MCVC व ITI विद्यार्थी: ज्या विद्यार्थ्यांचा डेटा ऑनलाइन FYJC मध्ये उपलब्ध नाही (उदा. MCVC किंवा ITI), त्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल.

३. प्रेलिस्ट पडताळणी (Pre-List Verification): अर्ज सबमिट केल्यानंतर महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये प्रेलिस्ट उपलब्ध होईल. प्राचार्यांनी जनरल रजिस्टरनुसार विद्यार्थ्यांच्या नावाची स्पेलिंग, जन्मतारीख आणि विषयांची अचूकता तपासून घ्यावी. प्रेलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्का व विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे.

४. APPAR-ID नोंद: अर्ज भरताना विद्यार्थ्याचा ‘APPAR-ID’ उपलब्ध असल्यास त्याची सक्तीने नोंद करावी.

५. ऑनलाइन पेमेंट (SBI Gateway): कनिष्ठ महाविद्यालयांनी SBI च्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारेच एकत्रित परीक्षेच्या शुल्काचा भरणा करावा. जुन्या चलनाचा किंवा रोख स्वरूपात भरणा स्वीकारला जाणार नाही. चलन भरल्यानंतर स्टेटस “Send to Board” आणि “Paid” झाले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

​छायाचित्र (Photo) अपलोड करण्याचे कडक नियम

​परीक्षेच्या आवेदनपत्रावर फोटो अपलोड करताना खालील नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे:

  • ​फोटोचे स्वरूप: व्यावसायिक रीतीने काढलेला रंगीत पासपोर्ट साईज फोटो असावा. फोटो गेल्या ६ महिन्यांतील असावा.
  • ​फाईल फॉरमॅट व साईज: फोटोची फाईल JPEG (.jpg) स्वरूपातच असावी. इतर फॉरमॅटमधील (PNG, BMP) फाईल रिनेम करू नये. फाईलचा आकार २५ KB ते ४० KB दरम्यान असावा.
  • ​इतर निर्देश: विद्यार्थ्याचा चेहरा पूर्णपणे समोर असावा, दोन्ही डोळे व कान स्पष्ट दिसावेत. पार्श्वभाग (Background) पांढरा किंवा साध्या हलक्या रंगाचा असावा. शक्यतो अधिकृत शालेय गणवेशातच फोटो काढावा. एकदा अर्ज सबमिट झाल्यावर फोटो बदलता येणार नाही.

​FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

​Q1: बारावीच्या नियमित परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

Ans: नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ ही आहे.

​Q2: अपूर्ण माहिती किंवा चुकीचे नाव असलेस काय करावे?

Ans: अर्ज सबमिट करण्यापूर्वी कॉलेजच्या प्रेलिस्टवरून विद्यार्थ्याने आपली माहिती काळजीपूर्वक तपासावी. नाव किंवा जन्मतारखेत चूक असल्यास महाविद्यालयाच्या माध्यमातून वेळेत दुरुस्ती करून घ्यावी.

​Q3: बोर्डाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

Ans: अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in ही आहे.

Akshay

Founder & Lead Educator, Prof. Akshay Jadhav has been empowering students and parents through educational blogging for over a decade. Along with classroom teaching, he is committed to making vital school information, scholarships, and academic guidance accessible to all. Through ARP School, his vision is to ensure no student misses out on key educational opportunities.

Leave a Comment